मुंबई : अभिनेत्री सना खान, तिचा प्रियकर व नोकराला एका महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अंधेरी न्यायालयाने तिघांची 15 हजारांच्या जामिनावर मुक्तता केली. ओशिवरा येथे राहणारी सना ही बिग बॉसच्या सहाव्या भागात सहभागी झाली होती. ती राहत असलेल्या परिसरातील एका महिलेशी तिचा अनेक दिवसांपासून वाद होता. ती महिला वर्तमानपत्रतून आपली बदनामी करीत असल्याचा संशय सनाला होता. ती महिला
अंधेरी येथील एका जीममध्ये आली असता सना, तिचा प्रियकर इस्माईल, नोकर रामू कनोजिया यांनी तिला धक्काबुक्की करीत मारहाण केली. (प्रतिनिधी)