मुंबई : राज्य पोलीस दलातील तीन भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिका-यांची सहायक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अमरावती आयुक्तालयांतर्गत दोघा पोलीस उपायुक्तांची अदलाबदली करण्यात आली.परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेल्या समीर अस्लम शेख यांची सातारा जिल्ह्यात शहर सहायक अधीक्षक म्हणून तर निलभ रोहन (इचलकरंजी विभाग, कोल्हापूर) व सौरभ कुमार अग्रवाल (चौपडा, जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती आयुक्तालयांतर्गत परिमंडळ एकच्या उपायुक्त नीवा जैन यांची गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली. त्यांच्या पदावर त्या जागेवरील उपायुक्त यशवंत सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली. गृहविभागाच्या वतीने शुक्रवारी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
साताऱ्याच्या अप्पर अधीक्षकपदी समीर शेख, गृहविभागाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:46 IST