Join us  

समीर शर्मा आत्महत्या प्रकरण: "प्रसारमाध्यमांना तपासातील खासगी माहिती देऊ नका"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 4:54 AM

समीरच्या नातेवाइकांची मालाड पोलिसांना विनंती

मुंबई : मालाडच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेले अभिनेते समीर शर्मा (४४) यांची ‘मीडिया ट्रायल’ होऊ नये. तपासात उघड झालेली खासगी माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नका, अशी विनंती त्यांच्या नातेवाइकांनी मालाड पोलिसांना केली आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याला बायपोलरसारख्या मानसिक आजाराने ग्रासल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याचे सांगत शर्मा यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ते मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, सुशांत प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे शर्मा यांचे कुटुंबीय धास्तावले आहे. त्यामुळेच शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणातील तपासात उघड झालेली कोणतीही खासगी माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नका, अशी विनंती त्यांनी केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सिद्धार्थ रुग्णालयाचे एक पथक शर्मा यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधत असून त्यांची बहीण, भावोजी तसेच काही मित्रांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत.