Join us
Daily Top 2Weekly Top 5

समीर कुलकर्णीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 6, 2015 02:08 IST

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेला आरोपी व अभिनव भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य समीर कुलकर्णीचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळला.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेला आरोपी व अभिनव भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य समीर कुलकर्णीचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळला. अटकेआधी पोलिसांना मला भोपाळ येथे बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी कुलकर्णीने अर्जात केली. याला विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी विरोध केला. कुलकर्णीने हे सर्व मुद्दे खटला सुरू झाल्यानंतर कुलकर्णी उपस्थित करायला हवेत. या प्रकरणातील अजून एका आरोपीने उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कुलकर्णीचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती अ‍ॅड. सालियान यांनी केली. (प्रतिनिधी)