Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम...

By admin | Updated: March 8, 2015 22:27 IST

महिला दिनानिमित्ताने आज जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात गुणगौरवासोबतच मनोरंजनपर आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचाही समावेश होता.

माथेरान : महिला दिनानिमित्ताने आज जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात गुणगौरवासोबतच मनोरंजनपर आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचाही समावेश होता. माथेरान नगरपालिकेतर्फे येथील स्थानिक पातळीवर उलेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव तसेच माथेरान राष्ट्रवादी महिला संघटनेकडून येथील स्वच्छता विभागातील आणि रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांची गुणवत्ता आणि कर्तबगारी विविध क्षेत्रांत भरारी घेत असून कुशलता आणि निर्णयशक्तीच्या जोरावर आपले कर्तृत्व सिध्द करीत आहेत. माथेरानमधील महिलांनी पारंपरिक व्यवसायांना मागे सारत महिला बचत गटांच्या माधमातून येथील पर्यटनपूरक व्यवसाय सुरु केले. येथील प्राथमिक शाळेत दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रावस्थ नाट्य केंद्र मुंबई यांनी स्त्री भ्रूण हत्येविरोधात पथनाट्य सादर केले. दहावी व बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला. नगराध्यक्षा दिव्या डोईफोडे यांनी महिलांना स्वावलंबनाची शिकवण दिली. प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जीनोबिया लॉर्ड तर उपनगराध्यक्षा हिरावती सकपाळ, नगरसेविका वंदना शिंदे, लक्ष्मी चौधरी, सुनिता पेमारे, सुनिता आखाडे, प्रतिभा घावरे, आशा कदम व महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)