Join us

सलमानची सुनावणी चार आठवडे तहकूब

By admin | Updated: July 26, 2014 02:02 IST

अभिनेता सलमान खान याच्याविरुद्धचा हिट अॅण्ड रन खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांच्या समोर सुरू आह़े

मुंबई :  अभिनेता सलमान खान याच्याविरुद्धचा हिट अॅण्ड रन खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांच्या समोर सुरू आह़े शुक्रवारच्या सुनावणीला साक्षीदार येणार नव्हत़े त्यामुळे सलमान देखील या सुनावणीला हजर नव्हता़ तशी मुभा न्यायालयानेच त्याला दिली होती़ तसेच कागदपत्रे सापडेर्पयत या खटल्याचे कामकाज सुरू करू नये, अशी विनंती सलमानच्या वतीने करण्यात आली़ ती मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली़
कागदपत्रे सापडत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करून सलमान खानचे वकील अॅड. श्रीकांत शिवदे म्हणाले की, न्यायालयाकडे पाठविलेला पहिला एफआयआर, दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अन्वये नोंदविलेले साक्षीदारांचे तीन जबाब व विविध पंचनामे एवढीच मूळ कागदपत्रे उपलब्ध आहेत. 63 साक्षीदारांच्या जबाहांपैकी फक्त तिघांच्याच जबावांच्या मूळ प्रती उपलब्ध आहेत. इतर सर्व कागदपत्रंच्या सत्यप्रती देण्यात आल्या आहेत.
आम्हाला दिलेल्या सत्यप्रती मूळ कागदपत्रच्या बरहुकूम आहेत की नाहीत हे ताडून पाहण्यासाठी मूळ कागदपत्रे उपलब्ध होणो गरजेचे आहे. अन्यथा त्याने आरोपीचेच नुकसान होईल, याकडे अॅड. शिवदे यांनी लक्ष वेधले. बारा वर्षापूर्वी सलमानने वांद्रे येथे चौघांना चिरडल़े यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानवर  खटला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू होता़  (प्रतिनिधी)