मुंबई : कार अपघात प्रकरणी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेविरोधात अभिनेता सलमान खानने केलेल्या अपील याचिकेवर गुरुवापासून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी सलमानच्या वकिलांनी सत्र न्यायालयाचा निकाल चुकीचा असून सलमान गाडी चालवतच नव्हता, असा दावा केला. बचाव पक्षाने सादर केलेले पुरावे सत्र न्यायालयाने ग्राह्य धरलेच नाहीत, असा युक्तिवादही करण्यात आला. न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सलमानचा जामीन रद्द व्हावा, यासाठी केलेला अर्जही न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. सलमानचा दिवंगत सुरक्षारक्षक पोलीस हवालदार रवींद्र पाटीलची आई सुशीलाबाई पाटील यांनी हा अर्ज केला होता. तसेच सलमानच्या खटल्याचे वृत्तांकन करताना कोणतीही टीकाटिप्पणी करू नका, असेही न्यायालयाने प्रसार माध्यमांना बजावले आहे. (प्रतिनिधी)
सलमानची सुनावणी सुरू
By admin | Updated: July 31, 2015 09:30 IST