मुंबई: सलमान अपघात प्रकरणी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेविरोधात अभिनेता सलमान खानने केलेल्या अपील याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी एका आठवड्यासाठी तहकूब केली.सत्र न्यायालयात खटल्याची इंग्रजीत भाषांतर केलेली कागदपत्रे द्यावी, अशी मागणी गेल्या महिन्यात सलमानने केली. मात्र ही कागदपत्रे अद्याप न मिळाल्याचे सलमानने सोमवारी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. ए.आर. जोशी यांच्या खंडपीठाने ही कागदपत्रे सलमानला देण्याचे आदेश न्यायालय प्रशासनाला दिले व ही सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)
सलमानची सुनावणी पुढील आठवड्यात
By admin | Updated: July 14, 2015 01:22 IST