मुंबई : हिट अॅण्ड रनप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सलमान खानने अपिलाच्या सुनावणीत आता ट्विस्ट निर्माण केले आहे. सलमानचा मित्र आणि गायक कमाल खान याला साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्याकरिता सलमानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्या. ए.आर. जोशी यांनी सरकारी वकिलांना या अर्जाबाबत गुरुवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. ‘सरकारी वकिलांनी या साक्षीदाराची साक्ष खटल्यादरम्यानच का नोंदवली नाही? कमाल खान हा सरकारी वकिलांसाठी अगदी योग्य साक्षीदार होता,’ असे सलमानतर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी सांगितले. अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवत होता? सलमान की त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग याचे उत्तर कमाल खान देऊ शकेल, असेही अॅड. देसाई यांनी सांगितले. कमाल खानव्यतिरिक्त सलमानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटील हा महत्त्वाचा साक्षीदार होता. खटल्यादरम्यानच त्याचा २००७मध्ये मृत्यू झाला. सरकारी वकिलांनी त्याने दिलेल्या जबानीवर अवलंबून राहून खटला चालवला. मात्र बचावपक्षाच्या वकिलांना त्याची उलटतपासणी घेता आली नाही, असा युक्तिवाद अॅड. देसाई यांनी केला. कमाल खान परदेशात असल्याने तो जबानी नोंदवण्यासाठी उपलब्ध नाही, असे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाला सांगितले. पण त्याला न्यायालयात आणण्यासाठी सरकारने मेहनत घेतली नाही. सरकारने या कृत्याचे स्पष्टीकरण द्यावे, असेही अॅड. देसाई यांनी न्या. जोशी यांना सांगितले.सत्र न्यायालयाने सलमान खान याला हिट अॅण्ड रन केसप्रकरणी ६ मे २०१५ रोजी पाच वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरोधात सलमान उच्च न्यायालयात अपिलात गेला आहे. ‘सरकारी वकिलांनी या साक्षीदाराची साक्ष खटल्यादरम्यानच का नोंदवली नाही? कमाल खान हा सरकारी वकिलांसाठी अगदी योग्य साक्षीदार होता. दुर्घटनेवेळी तो कारमध्येच होता,’ असे सलमानतर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्या. जोशी यांना सांगितले.
कमाल खानच्या साक्षीसाठी सलमानचा अर्ज
By admin | Updated: November 17, 2015 02:15 IST