Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदीला रंग सलमान-शाहरूखच्या मैत्रीचा!

By admin | Updated: November 18, 2014 01:29 IST

सलमान खानची बहीण अर्पिता ही आयुष शर्मासोबत मंगळवारी विवाहबद्ध होणार आहे. त्यासाठी संपूर्ण खान कुटुंबीय सोमवारी हैदराबादला रवाना झा

मुंबई : सलमान खानची बहीण अर्पिता ही आयुष शर्मासोबत मंगळवारी विवाहबद्ध होणार आहे. त्यासाठी संपूर्ण खान कुटुंबीय सोमवारी हैदराबादला रवाना झाले. अर्पिताचा नवरा आयुष हा हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील दिवंगत मंत्री सुखराम शर्मा यांचा नातू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खान या लग्नसोहळ्यास जाणार का, अशी चर्चा होती. रविवारी झालेल्या अर्पिताच्या मेहंदी कार्यक्रमानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी अर्पिताचा मेहंदी कार्यक्रम सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पार पडला. या वेळी शाहरूख खानने आवर्जून उपस्थिती दर्शवली. शाहरूखच्या स्वागतासाठी संपूर्ण खान कुटुंबीय हजर होते. मेहंदीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत शाहरूखने सलमानची आई सलमा आणि वडील सलीम खान यांच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. अर्पिताची मेहंदी लावून झाल्यानंतर सलमान त्याला घेऊन अर्पिताच्या खोलीत गेला. काहीच दिवसांपूर्वी अर्पिताला एसएमएस पाठवून आपण लग्नाला आणि त्याआधी तुला भेटायला नक्की येऊ, असे शाहरूखने सांगितले. त्यामुळे तो आल्याचा आनंद अर्पिताच्या चेहऱ्यावर झळकत होता. सलमानसुद्धा या वेळी आनंदात होता. त्यानंतर खूप वेळ या दोघांनी गप्पा मारल्या. कॉफी प्यायली. अर्पिताच्या मोबाइलवरून तिने या दोघांचे फोटो काढले. ते सोशल मीडियावर अर्पितानेच प्रसिद्ध केले. साधारण तासाभराने शाहरूख तिथून निघाल्याचे सांगितले जाते. लग्नसमारंभासाठीही शाहरूख उपस्थित राहणार आहे. अर्पिता आणि आयुष शर्माचा विवाहसोहळा मंगळवारी हैदराबादच्या फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नाचा स्वागत समारंभ हैदराबाद, मुंबई तसेच दिल्लीतही होणार आहे. दिल्लीच्या स्वागत समारंभाची तारीख अजूनही निश्चित नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने सलमानने प्रत्यक्ष भेटून त्यांना आमंत्रण दिले आहे. (प्रतिनिधी)