Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला तूर्तास दिलासा, २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

By admin | Updated: May 6, 2015 16:57 IST

हिट अँड रन' प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला व पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याता आलेल्या सलमान खानला उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - 'हिट अँड रन' प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला व पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याता आलेल्या सलमान खानला उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केल्याने त्याला तूर्तास दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टाने सलामनला जामीन मंजूर केला असून त्याच्या जामीनावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. 
बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले आणि दुपारी त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.  न्यायालयाच्या निर्णयानंतर सलमानने जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. ठिपसे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.