मुंबई : हिट अॅण्ड रन घटनेनंतर अभिनेता सलमान खान हा दारू प्यायला होता की नाही? हे तपासण्यासाठी फॉरेंसिक लॅबला पाठवलेले रक्ताचे नमुने सलमानचे नव्हतेच, असा दावा बचाव पक्षाने गुरुवारी सत्र न्यायालयात केला़ही घटना घडल्यानंतर सलमानचे ६ एमएल रक्त तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले़ प्रत्यक्षात लॅबपर्यंत ४ एमएलच रक्त पोहोचले़ फेरफार करण्यासाठी २ एमएल रक्त पुरेसे असते. त्यामुळे हा नमुना बदललेला असून, तो नमुना सलमानचा नव्हताच, असा दावा बचाव पक्षाने केला. शिवाय कलिना येथील लॅबमध्ये हे रक्त तपासण्यात आले़ या लॅबला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही़ महत्त्वाचे म्हणजे या लॅबमध्ये रक्त तपासणारे या क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत़ त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची या प्रकरणी नोंदवण्यात आलेली साक्षदेखील विश्वासार्ह नाही, असा युक्तिवाद सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला़ यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे़ (प्रतिनिधी)
‘तो’ रक्ताचा नमुना सलमानचा नाही
By admin | Updated: April 17, 2015 01:38 IST