Join us

सलमान खटल्याची कागदपत्रे गहाळ

By admin | Updated: July 26, 2014 02:37 IST

सलमान खान याच्या विरुद्धचा ‘हिट अॅण्ड रन खटला’ आता तपासाची अनेक मूळ कागदपत्रे सापडत नसल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा चार आठवडय़ांसाठी तहकूब करण्यात आला़

मुंबई :  आधी साक्षीदार गायब झाले म्हणून लटकलेला अभिनेता सलमान खान याच्या विरुद्धचा ‘हिट अॅण्ड रन खटला’ आता  तपासाची अनेक मूळ कागदपत्रे सापडत नसल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा चार आठवडय़ांसाठी तहकूब करण्यात आला़
या खटल्यातील 63 कागदपत्रे गहाळ झाली असून, त्यातील केवळ सातच सध्या पोलिसांच्या हाती लागली आहेत़ याआधीही ही कागदपत्रे सापडत नसल्याने न्यायालयाने खटल्याची सुनावणी तहकूब केली होती़ मात्र या वेळी न्यायालयाने वांद्रे पोलिसांना ही कागदपत्रे शोधण्यासाठी अंतिम चार आठवडय़ांची मुदत दिली आह़े (प्रतिनिधी)