Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाशी मार्के टमध्ये १५ लाख आंबा पेट्यांची विक्री

By admin | Updated: April 12, 2015 01:55 IST

वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्के टमधून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठविण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्के टमधून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठविण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आतापर्यंत वाशी मार्केटमध्ये १५ लाख पेट्या पाठविण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १० लाखाने घट झाली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत २५ लाख पेट्या विक्रीस आल्या होत्या. शनिवारी मार्केटमध्ये ५२ हजार पेट्या विक्रीस आल्या असल्याची माहिती मुंबई कृ षी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली.गेल्या महिनाभरात उष्म्याचे प्रमाण वाढल्यामुळे आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे मुंबई बाजारातील आवक दिवसेेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, १ हजार ते साडेतीन हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरु आहे.वाशी मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या आंब्याच्या ४० टक्के आंब्याची निर्यात आखाती व अन्य देशामध्ये केली जात आहे. आखाती देशातून आंब्याला चांगली मागणी होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. परंतु आवक वाढल्याने आता हा दर १ हजार ते साडेतीन हजारापर्यंत खाली आला आहे. परदेशी निर्यात सुरु झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर रहाणे अपेक्षित होते. त्यातून शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काही अंशी भरुन येण्यास मदत झाली असती. परंतु यावर्षीही अवकाळी नुकसानाबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (प्रतिनिधी)च्झाडांना घालण्यात येणारी खते, मोहोर आल्यापासून वापरण्यात येणारी किटकनाशके, किटकनाशकांचे वाढते दर, इंधन खर्च, मजूरी, आंबा तयार झाल्यानंतर मार्के टमध्ये पाठवेपर्यंत करण्यात येणारा वाहतूक खर्च, हमाली, दलाली आदी खर्च वगळता शेतकऱ्यांच्या पदरी प्राप्त होणारे उत्पन्न अल्प आहे. च्यावर्षी अवकाळी पावसाने चांगलाच फटका आंबा पिकाला बसला. अवकाळी पावसामुळे आंबा गळून पडण्याचे प्रत्यक्ष नुकसान झालेच, शिवाय आंब्यावर काळा डागही पडला आहे..