Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट घड्याळांची बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:05 IST

मुंबई : नामांकित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुंबई : नामांकित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७८ हजार ३९० रुपये किमतीची घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.

दिलीप राधेश्याम स्वरणकर (३८) कंपनीच्या तपासी अधिकारीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका दुकानात नामांकित कंपनीची बनावट घड़याळे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळताच, त्यांनी पोलिसांसह तेथे धाव घेतली. येथील मुसाफिरखाना परिसरातील अभिनंदन संतोष सिंग (२१) याच्या दुकानात झडती घेतली. सुरुवातीला झडती घेण्यास दुकानदाराने नकार दिला. मात्र, पोलिसांनी तपासणी करताच त्याच्याकडे एका नामांकित कंपनीची नक्कल केलेली बनावट घड्याळे सापडली. त्याच्याकड़ून ७८ हजार ३९० रुपये किमतीची घड्याळे मिळून आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे.