Join us

शॉपिंग मॉलमध्ये बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST

५ जणांना अटक; मालाडमधून २४ लाखांची उत्पादने जप्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड येथील क्रिस्टल प्लाझामध्ये गुन्हे शाखेने ...

५ जणांना अटक; मालाडमधून २४ लाखांची उत्पादने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाड येथील क्रिस्टल प्लाझामध्ये गुन्हे शाखेने गुरुवारी छापा टाकून पाच गाळ्यांंमधून २४ लाख रुपये किमतीची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ने ही कारवाई केली.

क्रिस्टल प्लाझामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या उत्पादनांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. तेव्हा पाच गाळ्यांमध्ये नामांकित कंपनीचे बनावट सौंदर्यप्रसाधने सापडली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आराेपी मालाड, नालासोपारा, कांदिवली या भागातील रहिवासी आहेत. त्यांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

..................