Join us

दहा हजार शिक्षकांना मुंबई बँकेमार्फत वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:20 IST

शिक्षण विभागाकडे पगारपत्रके जमा करणाºया ४५३ शाळांतील सुमारे दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन मुंबई बँकेने त्यांच्या खात्यात जमा केले आहे. त्यापैकी बहुतांश जणांनी वेतन

मुंबई : शिक्षण विभागाकडे पगारपत्रके जमा करणाºया ४५३ शाळांतील सुमारे दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन मुंबई बँकेने त्यांच्या खात्यात जमा केले आहे. त्यापैकी बहुतांश जणांनी वेतन काढले आहे. अनेकांनी कर्जासाठी अर्ज दाखल केले असून ४ कोटी ३५ लाखांचे कर्ज वितरित केल्याचे मुंबई बॅँकेकडून सांगण्यात आले.राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई बँकेत खाते उघडण्यासाठी ६९७ शाळांनी पुढाकार घेतला असून सुमारे १४,७५६ शिक्षकांची केवायसी कागदपत्रांच्या पूर्ततेसह बँकेत खाती उघडली आहेत. शिक्षकांची खाती वेळेत उघडून पगार त्वरित जमा करण्यासाठी कर्मचाºयांनी ज्यादा वेळ तसेच सुट्टीच्या दिवशीही काम सुरूच ठेवले आहे. रोज एक हजारपेक्षा जास्त शिक्षकांची खाती उघडली जात आहेत, असे सरव्यवस्थापक डी.एस. कदम यांनी सांगितले. बँकेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी गणपती स्पेशल लोन आॅफर सुरू केली असून त्यामध्ये कर्मचाºयांना त्यांच्या वेतनाइतकेच ‘ओव्हरड्राफ्ट’ कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी परतफेड कालावधी १२ महिन्यांचा असून १० टक्के व्याजदर आहे. बँकेने राबविलेल्या या योजना व सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.