Join us

साकीनाका पोलिसांची चांदिवलीत धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:08 IST

५२ लाखांचे अमली पदार्थ हस्तगतएकाला अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साकीनाका पोलिसांनी चांदिवली परिसरात धाड टाकत जवळपास ...

५२ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत

एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साकीनाका पोलिसांनी चांदिवली परिसरात धाड टाकत जवळपास ५२ लाखांचे अमली पदार्थ शुक्रवारी हस्तगत केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

चांदिवलीच्या संघर्षनगरमध्ये असलेल्या एच १० क्रमांकाच्या इमारतीत अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक पडवी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकासह तेथे धाड टाकली. त्या ठिकाणी त्यांना ३४५ किलो भांग सापडली. याची बाजारातील किंमत ५१ लाख ८२ हजार ८७५ रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अशोक माणिक मैत्रे (वय ३९) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

..........................