Join us

कॉन्स्टेबलवरील गुन्ह्याचा तपास सायन पोलिसांकडे

By admin | Updated: March 27, 2017 04:23 IST

तरुणीवर बलात्कार व भू्रणहत्या केल्याचा गुन्हा दाखल होऊनही ४८ तास उलटले असले तरी पोलीस कॉन्स्टेबल तुषार

मुंबई : तरुणीवर बलात्कार व भू्रणहत्या केल्याचा गुन्हा दाखल होऊनही ४८ तास उलटले असले तरी पोलीस कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास आता भोईवाडा पोलिसांकडून सायन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला एका तरुणीला आमिष दाखवीत कॉन्स्टेबल तिऊरवडेने शारीरिक संबंध ठेवले होते. तिला मारहाण करून गर्भपात केला. याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आली. भोईवाडा पोलिसांकडे तरुणीने तक्रार दिल्यानंतरही कारवाई झालेली नाही. उलट तिऊरवडेच्या सांगण्यावर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तरुणीला बसवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत तेथील वरिष्ठ निरीक्षक मृदुला लाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)