Join us

मच्छीमार बोटीतून समुद्रात खलाशी पडून बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 21:15 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या उत्तानच्या  "लरिसा" नावाच्या मासेमारी बोटीतून खलाशी समुद्रात पडल्याची घटना घडली आहे . ...

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या उत्तानच्या  "लरिसा" नावाच्या मासेमारी बोटीतून खलाशी समुद्रात पडल्याची घटना घडली आहे . त्याचा अजून शोध लागलेला नाही . 

भाईंदरच्या उत्तन भाटे बंदर येथील  जॉर्डन इग्नेस लांनगी यांची  लरिसा नावाची मच्छीमार बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली आहे . उत्तन किनाऱ्या पासून खोल समुद्रात सुमारे अर्धा नॉटिकल मेल अंतरावर रविवार २० डिसेम्बरच्या रात्री ११ च्या सुमारास बोटी वरील खलाशी बाळाराम सूकूर हंडवा ( ४०) रा. मु.लालोंडे,  बोईसर ता. पालघर हा समुद्रात पडला . रात्रीच्या काळोखात तो समुद्रात पडून कुठे वाहून गेला हे कोणालाच कळले नाही .  देखील त्याचा शोध मच्छीमारांनी चालवला . परंतु  मंगळवार पर्यंत त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याचे मच्छीमारां कडून सांगण्यात आले .