Join us

सहर्षचा नवी मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By admin | Updated: November 27, 2015 02:03 IST

वाशी येथे राहणाऱ्या सहर्ष देऊलकर या तरुणाने नवी मुंबई ते कन्याकुमारी १७०० किमीचा प्रवास सायकलने केला. सायकलिंगविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी

नवी मुंबई : वाशी येथे राहणाऱ्या सहर्ष देऊलकर या तरुणाने नवी मुंबई ते कन्याकुमारी १७०० किमीचा प्रवास सायकलने केला. सायकलिंगविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच त्याचे महत्त्व नागरिकांना कळावे याकरिता त्याने नुकताच ११ दिवसांचा साहसी प्रवास २६४ तासांमध्ये पूर्ण केला. या सायकल प्रवासाच्या माध्यमातू त्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या पाच राज्याचा प्रवास केला. वाशीतील मॉडर्न कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबरच आपला सायकलिंग छंद जोपासत अनेक राज्यांमध्ये सायकलने भ्रमंती केली. अभ्यासाबरोबर सायकलिंगचा छंद जोपासता यावा म्हणून यंदाच्या दिवाळीच्या सुटीत सहर्षने हा सायकल प्रवास केला जेणेकरुन त्याच्या अभ्यासावर कसलाही परिणाम होणार नाही. दिवाळीच्या सुटीत त्याने केलेल्या या प्रवासाने महाविद्यालयातील शिक्षकांनीही मोठ्या कौतुकाने त्याची पाठ थोपटली आहे.या प्रवासादरम्यान निसर्गाच्या सहवासात राहण्याची संधी मिळाल्याने निसर्गाबद्दलची आत्मीयता आणखीणच वाढीस लागल्याचे सहर्षने सांगितले. या प्रवासादरम्यान ३ वेळा सायकल पंक्चर झाली तरी कित्येक वेळा पडझड झाली तरी न डगमगता हा सायकल प्रवास केल्याचे त्याने सांगितले.सायकल हे उत्तम वाहन असून इंधनाच्या बचतीबरोबरच शारीरिक व्यायाम होतो. दिवसेंदिवस लोप पावत चालेल्या सायकलिंगचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवास केला. यापुढेही मला जगाच्या कानाकोपऱ्यात सायकलिंगचे महत्त्व पटवून द्यायचे आहे.- सहर्ष देऊलकर, सायकलस्वार