Join us  

सह्याद्री देवराई गाण्यांच्या माध्यमातून पोहोचणार घराघरांत !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 5:34 AM

अभिनेते सयाजी शिंदे । झाडांच्याही जत्रा झाल्या पाहिजेत; वृक्षबँका हीच जिल्ह्यांची श्रीमंती

दीपक शिंदेसातारा : कोणाला घर बांधावे वाटते. त्यासमोर एखादी सुंदर बाग असावी; पण एखादे जंगल उभारावे, अशी कल्पना केवळ अवलियाच्याच डोक्यात येते. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर उजाड डोंगर हिरवेगार करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून अभिनेते सयाजी शिंदे करीत आहेत. ही वृक्षलागवड आता गाण्याच्या माध्यमातून लोकचळवळ होऊ लागली आहे. याबाबत सयाजी शिंदे यांच्याशी केलेली बातचीत. 

ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनामुळे लोकांना कळले आहे का?कोरोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजनचे महत्त्व कळले. याची कमतरता जाणवू लागल्याने काय स्थिती होते, याची जाणीव झाली. झाडांच्या माध्यमातून मोफत मिळणाऱ्या आणि पैसे देऊनही न मिळणाऱ्या ऑक्सिजनबाबत सर्वांचेच डोळे उघडले. पण, तोपर्यंत डोळे पांढरे होण्याची वेळ अनेकांवर आली. 

माणूस एखाद्या गोष्टीवर पैसा लावतो... तुम्ही झाडे लावता?कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या तरी माणसाला शांती आणि समाधान हवे असते ते विकत मिळत नाही. पण झाडाखाली बसला तर या दोन्ही गोष्टी मिळतात. कोट्यवधी रुपयांच्या गाडीत बसल्यानंतरही जेव्हा गाडीबाहेर उतरतो, त्यावेळी आपण गाडीही झाडाखाली लावायला सांगतो. मग पैसा महत्त्वाचा की झाड?वृक्षसंमेलन आपण सुरू करण्यामागची भावना?अजगावागावांत जत्रा निघतात खंडोबा, भैरोबा, जानाईदेवीची. त्यांच्या नावाने आपण चांगभलं म्हणतो... त्याप्रमाणे झाडांच्याही जत्रा झाल्या पाहिजेत. त्यामध्ये ‘लिंबाच्या नावाने चांगभलं, आंब्याच्या नावाने  (पान ४ वर)

 

निसर्गजागृतीसाठी गाणे येत आहे?

होय, राज्यात पंधरापेक्षा जास्त देवराया उभ्या केल्या. लाखो झाडे लावली. विशेषत: तरुण पिढीला आवाहन करताना मी काही गाणी सादर केली. गाण्यांचा व्हिडिओ तयार करावा, अशी मागणी झाली. ही गाणी हिंदीतील नामवंत तंत्रज्ञांच्या मदतीने तयार करणार आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य गाण्यांच्या कोरिओग्राफीसोबत स्वत: गाणारही आहेत. गाणे मी स्वत: मराठी-हिंदीत लिहिले व गायले आहे. याचा व्हिडीओ सगळ्या वयोगटांतील लोकांना प्रेरणा देणारा असेल. पुढच्या वाटचालीसाठी सर्वांचा सहभाग व आर्थिक मदत  महत्त्वाची आहे. त्यासाठी सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा. एचडीएफसी बँक, क्रमांक ५०१००३३१७९६५३७, आयएफसी कोड एचडीएफसी००००२१२ या क्रमांकावर मदत करण्याचे आवाहनही करीत आहे.

टॅग्स :सयाजी शिंदेमुंबईबीड