Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोशीत साजरा होतोय 'साहेब उत्सव'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:05 IST

मुंबई - ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना दिली. शनिवारी ...

मुंबई - ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना दिली. शनिवारी २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुखांची जयंती आहे. यानिमित्त खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी रविवार, दि. १७ ते ३१ पर्यंत ‘साहेब उत्सवा’चे आयोजन केले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हा पंधरवडा संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करण्यासाठी साजरा केला जाणार असून, या उत्सवातून शिवसेना एकात्मता आणि संस्कृतीचे जतन करण्याची शिकवण पुढच्या पिढीला देणार असल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली.

साहेब उत्सव २०२१ निमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्रात शाखा क्र. ४२ तर्फे दि. २३ रोजी कॅरम स्पर्धा, २४ प्रत्येक उपशाखाप्रमुख यांच्या विभागवार मुलांच्या चित्रकला स्पर्धा युवासेना यांच्यामार्फत दि.१७ रोजी रांगोळी स्पर्धा दि. २३ व २४ रोजी कबड्डी स्पर्धा दि. २३ निबंध स्पर्धा (ऑनलाईन) दि. २६ रोजी चित्रकला स्पर्धा (ऑनलाईन) दि. ७ फेब्रुवारी वृक्षारोपण कार्यक्रम व शिवसेना शाखा क्रमांक ४१ युवासेना, युवतीसेना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

-------------------------------------------