Join us
Daily Top 2Weekly Top 5

नथुराम गोडसेंचे कृत्य योग्य हे म्हणणेच दु:खद!

By admin | Updated: January 31, 2015 22:24 IST

अहिंसा आणि असहकाराचा अंगिकाराने महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

पनवेल : अहिंसा आणि असहकाराचा अंगिकाराने महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र त्याच महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या कृत्य योग्य असल्याचे काहीजणांकडून बोलले जाते, हे अतिशय दु:खद असल्याची भावना महात्मा गांधी यांच्या अहसकार चळवळीतील सक्रीय स्वातंत्रसेनानी तथा युसुफ मेहेरअली सेंटरचे विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉ.जी.जी.पारीख यांनी शुक्रवारी तारा-पनवेल येथे व्यक्त केली. मुंबई फ्रिडम फायटर्स सभा, खादी व्हिल्ज इंडस्ट्रीज असोसिएशन, वैकुंठभाई मेहता रिसर्च सेंटर, एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि युसुर मेहेर अली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘जागतीक तापमान वाढ एक समस्या’ या कार्यशाळेचे उद्धाटन डॉ.पारीख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळÞी ते बोलत होते. यावेळÞी साने गुरूजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश डहाळे, युसुर मेहेर अली सेंटरचे मतीन दीवान, ,कामगार नेते सुभाष लोमटे,अटलबिहारी शर्मा, इमरान माडाम, सामाजिक कार्यकर्ते मदन मराठे, मधुकर पाटिल, माधुरी घरत, गुड्डी तिवारी,कृष्णा म्हात्रे, बाळकृष्ण सावंत, खारपाडा-तारा ग्रामपंचायत सदस्या शोभा ठाकुर, राजश्री घरत आदिंसह सुमारे २०० गांधी विचारी कार्यकर्ते उपस्थित होते.पारीख म्हणाले, रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या शब्दाचा अर्थ महान आत्मा असा आहे. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते अहिंसक सत्याग्रहाचे जनक होते. या महान नेत्याची आठवण म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनी खादी ग्रामोद्योग आंदोलन बैठक आणि पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. प्रत्येकाने वर्षाला किमान सहा मीटर खादी खरेदी करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन डॉ.पारीख यांनी अखेरीस केले.कार्यशाळेत सकाळच्या सत्रात खादी ग्रामोद्योग आन्दोलन आढावा बैठक घेण्यात येऊन आगामी वर्षासाठी खादी ग्रामोद्योग आन्दोलनाचे निमंत्रक म्हणून जबाबदारी युसूफ मेहरअली सेंटरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुपारच्या सत्रात ‘जागतीक तापमान वाढ एक समस्या’ या विषयावरील कार्यशाळेत पर्यावरण तज्ज्ञ नंदन काल्बक, नीरज जैन आणि प्रशांत महाजन यांनी पर्यावरणाची सद्यस्थिती, तापमान वाढीची कारणे आणि नैसर्गीक असमतोलाची कारणे व उपाय योजना या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस निसर्गमित्र, पर्यावरणप्रेमी, पर्यावरण संरक्षण क्षेत्रांतील कार्यकर्ते व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.