Join us

सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:06 IST

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला काेरोनाची लागण झाली आहे. सचिनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्वत:ला ...

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला काेरोनाची लागण झाली आहे. सचिनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्वत:ला काेरोना झाल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी ताे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

कोरोना विषाणूपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह आहे. घरातील अन्य सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला होमक्वारंटाइन करून घेतले आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य काळजी घेत आहे, असेही त्याने या पाेस्टमध्ये नमूद केले असून डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

.............................