Join us

चौथीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर

By admin | Updated: May 28, 2014 08:57 IST

भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या देदीप्यमान कामगिरीची नोंद शालेय पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.

चौथीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरमुंबई : भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या देदीप्यमान कामगिरीची नोंद शालेय पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे. कोलाजच्या माध्यमातून सचिनच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आलेख विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे.आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या मराठी आणि इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात सचिनचा धडा समाविष्ट केला जाणार असल्याचे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले़ अभ्यासक्रमात सचिनचा धडा समाविष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकेल, असे दर्डा म्हणाले़ एखाद्या क्रिकेटरची कारकीर्द पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी चंद्रकांत गुलाबराव बोर्डे ऊर्फ चंदू बोर्डे आणि सुनील गावस्कर यांचाही धडा शालेय पाठ्यपुस्तकात होता, असे सांगून दर्डा म्हणाले कोणत्या इयत्तेत सचिनचा धडा समाविष्ट करावा, याबाबत बालभारती विषय समितीने चर्चा केली़ त्यानंतर हा धडा चौथीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला़ २४ वर्षांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीनंतर वयाच्या ४० व्या वर्षी सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली़ क्रिकेटच्या इतिहासात २२ यार्डाचा राजा अशीच सचिनची ओळख राहील़ या धड्यातून तरुण पिढीला देशभक्ती आणि आपल्या कामावरील निष्ठेबाबत प्रेरणा मिळेल, असे दर्डा म्हणाले़ महाराष्ट्र राज्य पुस्तक महामंडळाने चौथीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात कोलाजच्या रूपात सचिनच्या कामिगरीवर प्रकाशझोत टाकला आहे. यामध्ये सचिनने बजावलेली कामगिरी, त्याने मिळवलेलेे पुरस्कार आणि त्याच्या शेवटच्या सामन्यानंतरचे भाषण यांचा समावेश आहे.