Join us

सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर यांना जामीन मंजूर

By admin | Updated: January 3, 2017 17:48 IST

सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे, हे कलाकार पुरोगामी शाहिरांचा वारसा चालवत

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 3 - सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे, हे कलाकार पुरोगामी शाहिरांचा वारसा चालवत समाजात जनजागृती व लोकप्रभोधनाचे काम करत होते. कबीर कला मंचच्या या कलावंताना नक्षलवादी ठरवून खटले दाखल करण्यात आले. 2013 पासून हे अर्थर तुरुंगात होते. 2011 साली दहशतवादी विरोधी पथकाने नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप आणि गाण्याच्या माध्यमातून समाजात असंतोष पसरवत असल्य़ाचा या कलाकरंवर ठपका ठेवला. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी हे कलावंत भूमिगत होते. 2013 साली शीतल साठे आणि सचिन माळी यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान पोलिसंसमोर स्वत:हून हजर झाले. त्या नंतर काही दिवसांनी सागर गोरखे, रमेश गायचोर हे ही हजर झाले. शीतल साठे यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आता या तिघांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.