Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिनही व्याघ्रदूत

By admin | Updated: August 18, 2015 03:17 IST

महानायक अमिताभ बच्चननंतर आता ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची सुद्धा राज्य शासनाने ‘व्याघ्रदूत’ म्हणून निवड केली आहे. राज्याचे अर्थमंत्री

मुंबई : महानायक अमिताभ बच्चननंतर आता ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची सुद्धा राज्य शासनाने ‘व्याघ्रदूत’ म्हणून निवड केली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहाला मान देत सचिन तेंडुलकरने हा करार स्वीकारला आहे. मुनगंटीवार यांच्या पत्राला उत्तर देताना सचिनने लिहिले की, ‘वाघांची सुरक्षा आणि संरक्षण या उद्देशाने जे प्रयत्न केले जात आहेत, त्याची आपण प्रशंसा करतो. याविषयी चर्चा करण्यासाठी आपणास भेटण्यास आनंद होईल. वाघांच्या सुरक्षेबाबत मी नेहमीच जागरूक राहिलो आहे. मी एक कसोटी शतक याच उद्देशाने समर्पित केले होते.’याआधी, मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात बच्चन यांच्याशी याविषयी चर्चा केली होती. महाराष्ट्रामध्ये निसर्ग आणि वन्यजीव संपदा मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात एकूण सहा, मध्य प्रदेशमध्ये चार, छत्तीसगडमध्ये तीन तर तेलंगणमध्ये एक संरक्षित व्याघ्र प्रकल्प आहे. देशात एकूण २२२६ वाघ आहेत.