ठाणे : मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत-कसारा दरम्यानच्या स्थानकांतील फलाट आणि लोकलमधील अंतर कमी करण्यासाठी ठाण्यातील नागरिक मुकेश वलेचा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रारीचे पत्र पाठवले. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून थेट रेल्वे मंत्रालयाकडे ती तक्रार वर्ग केली आहे आणि याबाबत करण्यात येणाºया कारवाईचा अहवालही सादर करण्यास सांगितले आहे.स्थानकातील फलाट आणि लोकलमधील अंतर जास्त आहे. ते कमी करण्यासाठी वलेचा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठवले. त्याचसोबत डोंबिवली स्थानकातील बोलके छात्राचित्रही जोडले होते. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने ती तक्रार राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठवून कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या.तसेच नुकतीच ती तक्रार पंतप्रधान कार्यालयाने रेल्वे मंत्रालयाकडे पाठवल्याचे पत्राद्वारे वलेचा यांना पंतप्रधान कार्यालयाने कळवले. तसेच त्यांना आलेल्या पत्रात प्रधान सचिव आणि रेल्वे मंत्रालयाला याबाबत करण्यात येणाºया कार्यवाहीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयास सादर करण्याच्या सूचना केल्याचे म्हटले आहे.या तक्रारीबाबत दोन पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून आली आहेत. तसेच ती तक्रार राज्याकडे तसेच रेल्वे मंत्रालयाकडे पाठवल्याचे कळवले आहे. काही दिवसांतचतक्रार निकाली निघेल, असेमुकेश वलेचा या तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
सामान्यांच्या तक्रारीला तत्काळ प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:09 IST