Join us  

मुंबईत चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी धावपळ; अँटिजन चाचण्यांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 1:15 AM

मुंबईत खासगी व शासकीय प्रयोगशाळा मिळून दररोज चार हजार चाचण्या होत होत्या.

मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यात गेले चार महिने काम करणाºया अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वांत आघाडीवर असलेल्या यंत्रणेतील कर्मचाºयांची म्हणजेच डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांची चाचणी करण्यास शुक्रवापासून महापालिकेने सुरुवात केली आहे. तसेच अँटिजन चाचण्यांचे प्रमाणही आता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.

मुंबईत खासगी व शासकीय प्रयोगशाळा मिळून दररोज चार हजार चाचण्या होत होत्या. हे प्रमाण वाढविण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रि प्शनशिवाय चाचणी करण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल देणाºया अँटीजन किटचा वापर सुरू करण्यात आला. त्यामुळे आता दररोज सरासरी सहा ते सात हजार चाचण्या केल्या जात आहेत. मात्र हे प्रमाण कमी असल्यामुळे चाचण्या वाढविण्यात याव्यात, अशी सूचना राज्य सरकारकडून करण्यात आली होती.त्यानुसार पश्चिम उपनगरात, बाधित क्षेत्रांमध्ये अँटिजन किटचा वापर वाढविण्यात आला आहे.

दररोज दहा हजारांहून अधिक चाचण्या करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्याचबरोबर आता प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आरोग्य, स्वच्छता, मलनिस्सारण, झोपडपट्टीतील स्वच्छतेसाठी कार्य करणाºया स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान चालक संस्थांचे कार्यकर्ते, मलनिस्सारण व तत्सम कामकाज करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक कामकाजामध्ये सक्रिय सहभाग देणाºया बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांचीदेखील चाचणी करण्यात येणार आहे.

मुंबईतील प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोरोना आरोग्य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्ताच्या कर्तव्यावरदेखील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. या सर्वांची कोविड चाचणी केली जाणार आहे. महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करून या चाचण्या केल्या जाणार आहेत. आतापर्यंत बाधित रु ग्णांची संख्या एक लाख सहा हजार ८९१ वर पोहोचली आहे. तर गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत एकूण चार लाख ६५ हजार ७२१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई