Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारला

By admin | Updated: September 18, 2014 01:39 IST

डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 13 पैशांनी वधारला. रुपया सलग दुस:या दिवशी वधारला आहे.

मुंबई : निर्यातदारांकडून डॉलरची होत असलेली विक्री व व्याजदराबद्दल अमेरिकेत फेडरल रिझव्र्ह घेणार असलेल्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 13 पैशांनी वधारला. रुपया सलग दुस:या दिवशी वधारला आहे.
परदेशात कमकुवत झालेल्या डॉलरमुळे व परकीय कंपन्यांनी स्थानिक बाजारात कमी किमतीत निधी आणल्यामुळेही रुपया महाग व्हायला मदत झाली, असे फॉरेक्स डीलरने सांगितले.
फेडरल ओपन मार्केट कमिटीची दोन दिवसांची बैठक मंगळवारी सुरू झाली. काही काळासाठी का असेना व्याजदर कमीच ठेवला जाईल अशी अपेक्षा आहे, असे डीलर्सनी सांगितले.