Join us

शिवाजी मंदिरात बॉम्बची अफवा

By admin | Updated: December 28, 2014 01:43 IST

दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शनिवारी एक बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ उडला होता. त्यात बॉम्ब असल्याचा संशय आल्याने प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली होती.

मुंबई : दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शनिवारी एक बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ उडला होता. त्यात बॉम्ब असल्याचा संशय आल्याने प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली होती. एका कर्मचाऱ्याला बेवारस बॅग सापडल्यावर त्याने तत्काळ शिवाजी पार्क पोलिसांना कळविले. पोलिसांसह बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. बॅगेत कपडे सापडल्याने अफवा असल्याचे समजल्यावर प्रेक्षकांनी नि:श्वास सोडला.