Join us

सत्ताधारी राष्ट्रवादीला घरचा अहेर

By admin | Updated: November 29, 2014 00:55 IST

सत्ताधा:यांसह प्रशासनास नागरिकांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिले नाही. शहरातील प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली.

नवी मुंबई : सत्ताधा:यांसह प्रशासनास नागरिकांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिले नाही. शहरातील प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली. रखडलेल्या विकासकामांवरून स्वपक्षातील नगरसेवकांनीच कोंडी केल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीला घरचा अहेर मिळाला. 
नवी मुंबईमधील रखडलेल्या प्रश्नांचे प्रतिबिंब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू शिंदे यांनी वाशीतील अग्निशमन दलाच्या धोकादायक इमारतीची पुनर्बाधणी कधी केली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला. सत्ताधा:यांसह प्रशासनास आता जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिले नसल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. अग्निशमन दलाच्या इमारत पुनर्बाधणीचा प्रश्न रखडला असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शिवराम पाटील यांनीही हाच मुद्दा धरून राष्ट्रवादीला टार्गेट केले. आपण गांभीर्याने घेण्यास जरा उशीरच केला. मीटिंग व सेटिंगमध्येच चार वर्षे निघून गेली. अधिकारी रोज कुठे जात होते, असा प्रश्न उपस्थित करून पक्ष व नेत्यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतले. माजी उपमहापौर भरत नखाते यांनीही कामे होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 
प्रशासन कामे करीत नाही व नागरिक आम्हाला दोष देतात. कामे होत नसतील तर पुढील सभेच्या वेळी जमिनीवर बसण्याचा इशारा रविकांत पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)
 
माजी उपमहापौर भरत नखातेही कामे होत नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत. माङया चार फाइल पेंडिंग आहेत. आताच्या आता मला माङया फाईल द्या अन्यथा मी जमिनीवर बसतो. कोणत्याही स्थितीमध्ये मला माङया फाइल दिल्याच पाहिजेत, अशी भूमिका घेतली. 
 
नंतर उत्तराची वाट न पाहताच ते निघून गेले. सभागृह नेते अनंत सुतार यांनी नखाते यांच्यावरच तोंडसुख घेतले. पोटतिडकीने बोलून उत्तर न घेता माजी उपमहापौर गेले. यावरून त्यांना प्रश्नांचे किती गांभीर्य आहे हे कळते, असा टोलाही त्यांनी मारला.
 
विरोधक खूश : राष्ट्रवादी काँग्रेसनेच शहरात विकासकामे होत नसल्याची टीका केल्यामुळे विरोधक खूश झाले. सत्ताधा:यांना गांभीर्य नसल्याचे स्पष्ट केल्याबद्दल शिवसेनेच्या विठ्ठल मोरे यांनी राजू शिंदे यांचे आभार मानले. खरी बाजू मांडू दिली नाही तरी ती जनतेला कधी ना कधी कळतेच, असे स्पष्ट केले. महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर त्यांनी टीका केली. काँग्रेसच्या सिंधू नाईक व भाजपाच्या विजया घरत यांनीही कामे होत नसल्याची तक्रार  केली.