Join us  

वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या महापौरांनीच मोडला पार्किंगचा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:26 AM

पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनधिकृत पार्किंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच हरताळ फासला आहे.

मुंबई : पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनधिकृत पार्किंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच हरताळ फासला आहे. शनिवारी विलेपार्ले येथे महापौरांची गाडी चक्क ‘नो पार्किंग’च्या फलकाखालीच उभी असल्याची दिसून आली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी याबाबत महापौरांना दंड आकारला आहे. मात्र, गेले काही दिवस विविध कारणांमुळे अडचणीत आलेले महापौर या प्रकारामुळे पुन्हा गोत्यात आले आहेत.वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात वाहन उभे करणाºया वाहन मालकाला दंड करण्यात येत आहे. हा दंड तब्बल १० हजार रुपये असल्याने नागरिकांमध्ये या कारवाईविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. मात्र या कारवाईचा उद्देश उत्पन्न वाढविणे नसून पार्किंगला शिस्त लावणे असल्याचे महापालिका प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले असताना महापौरांनीच हा नियम मोडल्याचे दिसून आले.विलेपार्ले येथे एका रेस्टॉरंटच्या बाहेर दुपारच्या सुमारास महापौरांची गाडी उभी दिसली. विशेष म्हणजे नो पार्किंगच्या फलकाखालीच गाडी उभी करण्यात आली होती. हा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. मात्र त्या भागात वाहनतळ नसल्याची सारवासारव आता केली जात आहे.‘मी कारमधून उतरून हॉटेलमध्ये गेल्यानंतर चालकाने कार नेमकीकुठे उभी केली याची मला कल्पना नव्हती. मी माझ्या कर्मचारीवर्गाला नियमांचे पालन करण्याची सूचना करणार आहे. तसेच पालिकेने मला दंडाची पावती पाठवावी’, असे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.>महापौरांची यापूर्वीची वादग्रस्त विधाने व वादमुसळधार पावसात मुंबईची तुंबापुरी झाली असताना पाणी कुठेच तुंबले नाही, असा दावा केला होता.पर्जन्य वाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता यांना महापौरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण.गटारांवरील झाकण काढण्यास मुंबईकर जबाबदार, असे विधान करून स्थानिक नागरिकांचा रोष ओढावून घेतला होता.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका