Join us  

चक्क ८४ विहिरी गायब? कुठेच नोंद कशी नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 2:33 PM

माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी पालिकेकडे मागवल्या माहितीच्या आधिकाराखाली कीटक नियंत्रण विभागाकडू उपलब्ध झालेल्या माहितीत ही बाब समोर आलीय.

"जाऊ तिथे खाऊ" या नावाचा मकरंद अनसपुरेंचा मराठी चित्रपट तुम्ही पाहिला असेलच . पण या चित्रपटातली विहीर न बांधतात चोरील गेली होती . पण मुंबईतल्या कुर्ला परिसरात खऱ्या खुऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल ८४ विहिरी हरवल्याचं समोर आलंय . यातील खासगी मालकीच्या ४३ विहिरी आणि सरकारच्या ३८ आणि पालिकेच्या तीन विहिरींचा समावेश आहे . आणि याहून महत्वाची बाब म्हणजे या विहिरी हरवल्या असल्या तरी याची नोंद सरकारी   दफतरी नसल्याचं समोर आलंय . आणि याहून महत्वाची बाब म्हणजे सरकार दरबारी या विहिरी नेमक्या कश्या हरवल्याची माहितीच उपलब्ध नाही .

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर मुंबई सारखी शहरं वाढत होती , आणि या वाढत्या शहिरीकरणादरम्यान पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरी बांधण्यात आल्या होत्या . खासगी काही शासकीय विहिरी निर्माण केल्या गेल्या होत्या . पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी या विहिरींमधल्या पाण्याचा वापर होऊ लागला होता . पण पालिकेने मुंबईत पाण्याच्या पुरवठ्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेमुळे या विहिरींकडे सगळ्याचचं दुर्लक्ष झालंय . झपाट्याने विकास होत असताना यातील अनेक विहिरी बुजवल्या असल्याची शक्यता आहेत 

माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी पालिकेकडे मागवल्या माहितीच्या आधिकाराखाली कीटक नियंत्रण विभागाकडू उपलब्ध झालेल्या माहितीत ही बाब समोर आलीय . ८४ विहिरी यातील पालिकेच्या ३ , खासगी ४३ , सरकारी ३८ आणि ७ विंधन विहिरींचा समावेश आहे . या विहिरी गायब वा बुजवण्यात आल्या असल्याचं म्हणण्यात आलंय . तसेच या परिसरातील किती विहिरी पुनरुज्जीवित केल्या संदर्भातल्या माहितीवर मात्र 'त्या संदर्भातली नोंद पालिका दरबारी उपलब्ध नसल्याचं' उत्तर देण्यात आलं आहे .

२००९ मध्ये विहिरीच्या संवर्धनाची घोषणा करण्यात आली होती , पण पुढे या घोषणेचा पालिकेला विसर पडल्याचं आता चित्र आहे . त्याच बरोबर २००९ साली मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विहिरींचे संवर्धन करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी शिवसेनेलाही विसर पडल्याच या प्रकारावरून स्पष्ट झालेल आहे . मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वचननाम्यात शिवसेनेने विहिरींचे संवर्धन करण्याचे आश्वासन दिले होतं . पण त्यावर पुढे ठोस कोणतीच भूमिका घेण्यात आली नसल्याचं यामुळे समोर आलंय .

टॅग्स :मुंबईमाहिती अधिकार