Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्स-आरसीबी लढत आज

By admin | Updated: May 11, 2014 00:53 IST

रॉयल चॅलेंर्जस बॅँगलोर संघाला आयपीएलच्या सातव्या पर्वात रविवारी खेळल्या जाणार्‍या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

बेंगळुरू : गेल्या सामन्यात पराभव स्वीकारणार्‍या रॉयल चॅलेंर्जस बॅँगलोर संघाला आयपीएलच्या सातव्या पर्वात रविवारी खेळल्या जाणार्‍या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बॅँगलोर संघाला यापूर्वीच्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. दुसर्‍या बाजूचा विचार करता राजस्थान रॉयल्सला यापूर्वीच्या सामन्यात सनरायर्जस हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागला. फलंदाज अपयशी ठरल्यामुळे राजस्थान संघाला या लढतीत ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 
बॅँगलोर संघाची या स्पर्धेतील सुरुवात चमकदार झाली. गेलविना खेळताना या संघाने सुरुवातीला दोन सामन्यांत विजय मिळविला, पण त्यानंतर युएईमध्ये त्यांना सलग तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. स्नायूच्या दुखापतीमुळे गेलला या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांत सहभागी होता आले नाही. पुनरागमन करणार्‍या गेलने आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखविली.
 
च्विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बॅँगलोर संघ स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. बॅँगलोर संघाला आठपैकी पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. 
च्बॅँगलोर संघ ६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. त्यांच्यासाठी आता यानंतर होणारी प्रत्येक लढत ‘करा अथवा मरा’ अशा धरतीची आहे. राजस्थान संघ या स्पर्धेत पाच विजयांसह तिसर्‍या स्थानी आहे. 
च्बॅँगलोर संघ गृहमैदानावर खेळण्यात अपयशी ठरला. बॅँगलोर संघाला रॉयल्सविरुद्ध लढतीत फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.