Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दिव्यांग दारी मोहिमेची रोवली मुहूर्त मेढ

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 8, 2023 14:57 IST

दिव्यांग कल्याण विभाग,महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर पालिका आयोजित दिव्यांग्यांच्या दारी अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

मुंबई-पालिकेच्या सहकार्याने दिव्यांग मंत्रालय मार्फत, गोरेगावच्या नेस्को संकुलात  सरकार दिव्यांग दारी या मोहिमेची मुहूर्त मेढ रोवण्यात आली. दिव्यांग कल्याण विभाग,महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर पालिका आयोजित दिव्यांग्यांच्या दारी अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

सदर कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिकाच्या संपूर्ण सहकार्य मुळे शासनाने राबविला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व मार्गदर्शक  बच्चू कडू (मंत्री दर्जा) उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान अनेक दिव्यांग लाभार्थी बंधू भगिनींना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम काल  सकाळी ११ वाजता सुरु होऊन संध्याकाळी ६ वाजता संपन्न झाला.संपूर्ण दिवसभर सुमारे ६००० दिव्यांग उपस्थित होते.

कार्यक्रमाला मनपा अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, परिमंडळ ४ चे उपायुक्त विश्वास शंकरवार, नियोजन खात्याच्या संचालक  जांभेकर आणि पी दक्षिण विभाग साहाय्यक आयुक्त राजेश अक्रे तसेच दिव्यांग मंत्रालय सचिव महाजन हे उपस्थित होते.

बच्चू कडू  यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुंबई मनपाने विशेष परिश्रम घेतल्या बद्धल मनपाचे मनापासून आभार मानून, संपूर्ण राज्यात हा कार्यक्रम एक आदर्श मानून, सगळ्या जिल्ह्यात सुरू करू असे आश्वासन दिव्याग्यांना दिले.