Join us
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग्जवरून राडेबाजी

By admin | Updated: August 2, 2014 02:19 IST

मुंबईतील अवैध होर्डिंग्ज काढताना पोलीस संरक्षण नसल्याने राजकीय कार्यकर्ते अधिका-यांना मारहाण करतात व त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करतात

मुंबई : मुंबईतील अवैध होर्डिंग्ज काढताना पोलीस संरक्षण नसल्याने राजकीय कार्यकर्ते अधिका-यांना मारहाण करतात व त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करतात, असे महापालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले़तसेच अवैध होर्डिंग्ज हे बहुतांश वेळा रात्रीच लावले जातात़ त्यामुळे कारवाई कोणावर करावी, असा प्रश्न असतो़ त्यात परवानगी घेऊन लावलेल्या होर्डिंग्जला काही दिवसांची मर्यादा दिली जाते़ मात्र या मर्यादेचे दिवस ओलांडल्यानंतरही होर्डिंग्ज निघत नाही़ असे होर्डिंग्ज काढतानादेखील त्रास होता, असेही पालिकेचे म्हणणे आहे़न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एस़ चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर पालिकेने हा अर्ज सादर केला़ त्यावर न्यायालयाने राज्य शासनाला असे पथक स्थापन केले जाणार आहे की नाही, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देश दिले़ यावरील पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे़ त्यात न्यायालय काय आदेश देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ कारण, आता काही दिवसांवर गोपाळकाला व गणेशोत्सव आहेत़ त्यात अवैध होर्डिंग्ज सर्रास लावले जातील़