Join us

पॉर्नोग्राफी प्रकरणात रोवा खानच्या पतीलाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:05 IST

पती पत्नीनेच तयार केला होता अँँप, १० तारखेपर्यंत कोठड़ीपॉर्नोग्राफी प्रकरणात रोवा खानच्या पतीलाही अटक१० फेब्रुवारीपर्यंत कोठडी : ...

पती पत्नीनेच तयार केला होता अँँप, १० तारखेपर्यंत कोठड़ी

पॉर्नोग्राफी प्रकरणात रोवा खानच्या पतीलाही अटक

१० फेब्रुवारीपर्यंत कोठडी : पती-पत्नीनेच तयार केले होते ॲप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेली प्रोड्युसर, डायरेक्टर, मॉडेल रोवा खान ऊर्फ यास्मीनचा पती शान बॅनर्जी ऊर्फ दीपंकर खसनवीस (३९) याला मंगळवारी मालमत्ता कक्षाने अटक केली.

मढ येथील ग्रीन पार्क बंगलो परिसरात मालमत्ता कक्षाने छापा टाकून रोवासह प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ ऊर्फ सैफी या पाच जणांना अटक केली होती. त्यापाठोपाठ अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक असलेला उमेश कामतही जाळ्यात अडकला.

चाैकशीअंती समाेर आलेल्या माहितीत रोवा आणि तिच्या पतीने पॉर्न व्हिडिओ शेअर करण्यासाठी ॲप तयार केले होते. यावरूनच शान तिचे व्हिडिओ अपलोड करत होता. तो स्वतः फोटोग्राफीही करतो. त्यामुळे या दाम्पत्याचा यात महत्त्वाचा सहभाग होता. त्यानुसार सहायक पाेलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून शान बॅनर्जी ऊर्फ दीपंकर खसनवीस याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला बुधवार, १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बुधवारीच सर्व आरोपींची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

.....................................