Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीच्या त्या रेल्वे पुलाचे होणार रुंदीकरण

By admin | Updated: July 7, 2015 00:40 IST

ठाण्यातील कोपरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे. या पुलावर रोज रोज होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाण्यातील कोपरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे. या पुलावर रोज रोज होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत या पुलाचे रु ंदीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांना केली व त्यांनी ती तत्काळ मान्य केली.कोपरी येथील रेल्वे उड्डाणपूल ठाणेकरांसाठी दिवसेंदिवस अडचणीचा होत असून त्या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे त्याचे त्याचे रु ंदीकरण हाती घेणे आवश्यक होते. हा प्रकल्प सुमारे १०० कोटींचा असून यासोबतच भास्कर कॉलनीसाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून एक सब-वे देखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तीन हात नाक्यावर होणारी वाहतूककोंडी कमी होणार असून प्रवाशांचा मुंबईकडे जाण्याचा वेळ वाचणार आहे. तसेच कॅडबरी कंपनी येथील फ्लायओवरवरून पोखरण १ ला जाण्यासाठी एक मार्गिका केल्यास ठाणेकरांना सोयीचे होईल. असेदेखील अशीही चर्चा झाली. त्यामुळे ही मार्गिका करण्याचेदेखील या बैठकीत प्रस्तावित करण्यात आले. (प्रतिनिधी)