Join us

विद्यापीठातील वसतिगृहाच्या छताचा भाग पुन्हा कोसळला

By admin | Updated: December 25, 2014 01:17 IST

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाच्या छताचा भाग बुधवारी पुन्हा कोसळला

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाच्या छताचा भाग बुधवारी पुन्हा कोसळला. या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.कलिना येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहाच्या इमारतीचा काही भाग रविवारी कोसळला होता. या दुर्घटनेमधून एक मुलगी बचावली होती. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच बुधवारी याच वसतिगृहातील एक खोलीतील छताचा काही भाग कोसळला. मात्र विद्यापीठ प्रशासन विज्ञान परिषदेच्या तयारीत गुंतले असल्याने याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. विद्यापीठाला एखाद्या विद्यार्थिनीचा जीव विद्यापीठाला घ्यायचा आहे काय, असा सवाल विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी उपस्थित केला आहे. या वसतिगृहात आतापर्यंत छताचा भाग कोसळण्याच्या पाचहून अधिक घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)