मुलुंड : मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा परिसरातील इमारातीतील घराचे छत कोसळून दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली. लीलावती रमेश देढीया (५६) आणि धारा प्रीतम देढीया (३०) अशी जखमींची नावे असून, दोघीही मुलुंडच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. देढीया कुटुंबीय मुलुंड नानेपाडा परिसरातील भुवन ज्योत इमारातीत राहण्यास आहे. शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी कामाच्या गडबडीत असताना अचानक घराचे छत खाली कोसळले. यामध्ये घरच्यांनी वेळीच धाव घेत दोघींनाही घराबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. लीलावती यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. पालिका अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर दुसरीकडे मुलुंड जैन रोड येथील गोविंद कुंज इमारतीत राहणारे योगेश ठक्कर यांच्याही घराचे शनिवारी सिलिंग कोसळले. पण सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. (प्रतिनिधी)
मुलुंडमध्ये घराचे छत कोसळले, दोघे जखमी
By admin | Updated: September 15, 2014 01:51 IST