मुंबई : विक्रोळी पार्क साईट येथे घडलेल्या रोहित सिंग (२५) या तरुणाच्या हत्येप्रकरणी आणखी दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. देवेंद्रकुमार गोस्वामी (२२), प्रदीप गोस्वामी (२२) अशी आरोपींची नावे असून, त्यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने मनोज भंडारी या मजुराला मुंब््रयातून अटक केली होती. भंडारीने दिलेल्या माहितीनुसार, बीपीओमध्ये काम करणाऱ्या रोहितला अमलीपदार्थांची नशा जडली. नशेच्या नादात नोकरी सुटल्यानंतर रोहिनते परिसरात राहणाऱ्या मजुरांकडून खंडणी उकळण्यास सुरुवात केली. शिवाय मजुरांच्या महिलांवरही त्याची वाईट नजर होती. म्हणून त्याला अद्दल घडविण्याचे ठरले. मात्र मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असे भंडारीने पोलिसांना सांगितले.
रोहित सिंग हत्याकांडात दोघे गजाआड
By admin | Updated: July 29, 2015 02:19 IST