Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेहलपाडा-साबळे पाडा रस्त्यामध्ये खडीचा ढीग

By admin | Updated: May 1, 2015 22:30 IST

तालुक्यातील वेहलपाडा ते साबळेपाडा रस्ता दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे. तरी येथे पाच - सहा महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध खडीचे ढीग टाकले असून

विक्रमगड : तालुक्यातील वेहलपाडा ते साबळेपाडा रस्ता दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे. तरी येथे पाच - सहा महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध खडीचे ढीग टाकले असून येथील नागरिकांना पायी जाण्यासाठी जागा नसल्याने हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने ठेकेदाराला लवकरात लवकर रस्ता साकार करण्यास भाग पाडावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.रस्त्यावर खडी टाकली असून आमचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. पावसाळ्यापर्यंत रस्ता न झाल्यास आमचा रस्ता पूर्ण बंद होणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यासंदर्भात आम्ही अनेकदा सा.बां. विभागाची कार्यालयात तक्रारही केली. परंतु संबंधित काम करणारी एजन्सी माहीत नसल्याची उत्तरे दिली. हे काम लवकर न झाल्यास गावकऱ्यांनी बांधकाम कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिला. (वार्ताहर)