Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त बहिणीच्या उपचारासाठी लूट

By admin | Updated: August 26, 2015 10:19 IST

गोरेगावमधील पेट्रोल पंपाची १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटने मंगळवारी बेड्या ठोकल्या. अटक आरोपींमधील रत्नाकर व पद्माकर चौबे या भावंडांनी

मुंबई : गोरेगावमधील पेट्रोल पंपाची १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटने मंगळवारी बेड्या ठोकल्या. अटक आरोपींमधील रत्नाकर व पद्माकर चौबे या भावंडांनी चोरीमागील उद्देश सांगितला तेव्हा मात्र गुन्हे शाखेचे अधिकारीही गहिवरले. रक्ताच्या कर्करोगाने मृत्यूशय्येवर असलेल्या धाकट्या बहिणीच्या उपचारांसाठी या दोघांनी हा गुन्हा केला. अटकेची नव्हे, तर बहिणीचा इलाज अपुरा राहील याचीच चिंता त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होती, अशी माहिती गुन्हे शाखेतून मिळते.रत्नाकर, पद्माकर यांच्यासोबत शिवकांत शुक्ला, रोहित यादव अशी अटक आरोपींची नावे आहेत. १० आॅगस्ट रोजी या चौघांनी कट रचून गोरेगाव पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गावरील इंडियन आॅइलच्या पेट्रोल पंपाची १७ लाखांची रोकड लुटली होती. पंपावरील कर्मचारी ही रोकड घेऊन जवळच्या खासगी बँकेत जमा करण्यासाठी बाईकवरून निघाले होते. त्यांना वाटेत अडवून हा गुन्हा करण्यात आला होता. यापैकी पेट्रोल पंपावर काम करणारा शिवकांत अन्य तिघांना ओळखतो. त्यानेच तिघांना पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड कधी, कुठे व कशी भरली जाते ही महत्त्वाची माहिती पुरवली होती.अटकेनंतर गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत रत्नाकर आणि पद्माकर उच्चशिक्षित असल्याची माहिती पुढे आली. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या शिवकांतची वागणूक संशयास्पद होती. त्यामुळे गुन्हे शाखेने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार, पद्माकरला अटक करण्यात आले. तर रत्नाकर व रोहित उत्तर प्रदेशात फरार झाल्याचे समजले. त्यानुसार एक विशेष पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. त्यांनी इतर दोघांना अटक केल्याचे सहायक आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले. पेट्रोल पंपावरील रक्कम लंपासपद्माकर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्याची धाकटी बहीण उत्तर प्रदेशातील सोनपूर गावात राहते. ती सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी आहे. तिच्या उपचारांसाठी रक्कम झटक्यात उभी करण्यासाठी त्याने भावासह पेट्रोल पंपाची रोकड लुटण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोल पंपावर काम करणारा शिवकांत अन्य तिघांना ओळखतो. त्यानेच तिघांना पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड कधी, कुठे व कशी भरली जाते ही महत्त्वाची माहिती पुरवली होती.