Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्धेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत ठगांनी एका ७८ वर्षीय वृद्धेला लुटल्याची घटना सोमवारी माहीम परिसरात घडली. यात महिलेचे ...

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत ठगांनी एका ७८ वर्षीय वृद्धेला लुटल्याची घटना सोमवारी माहीम परिसरात घडली. यात महिलेचे ४ तोळे वजनाचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन माहीम पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

...

ऑनलाईन डल्ला

मुंबई : खातेदारांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती परस्पर चोरुन सायबर ठगाने खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन मलबार हिल पोलीस तपास करत आहेत. यात तक्रारदारांची १६ हजार १४९ रुपयांची फसवणूक झाली आहे.

...

मुलुंडमध्ये महिलेची आत्महत्या

मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील आर. आर. टी. रोड परिसरात तृप्ती शहा नावाच्या महिलेने रविवारी आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.