Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकाला लुटणाऱ्यांना अटक

By admin | Updated: May 29, 2017 04:55 IST

व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून त्याला लुटणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद इमाम अली पटेल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून त्याला लुटणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद इमाम अली पटेल, मोहम्मद फारुख सय्यद पटेल उर्फ महरुफ अशी अटक आरोपींची नावे आहेत.अंधेरी येथील रहिवासी असलेले मंजूर पटेल यांचा डंपर पुरविण्याचा व्यवसाय आहे. २४ मे रोजी महरुफ पटेल त्याच्या दोन मित्रांसोबत कार्यालयात आला. त्याने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली. त्यानंतर या त्रिकूटाने त्यांना चाकूच्या धाकाने पैसे देण्यास सांगितले. नंतर पटेल यांनी तत्काळ डी.एन. नगर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. गुन्हे शाखेने सापळा रचून दोघांना अटक केली.