मुंबई : केंद्रीय वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणांवरून घूमजाव करणे आश्चर्यकारक आहे. यातून भाजपा-शिवसेना सरकारचा संवैधानिक संस्थांवरील दबाव सिद्ध झाला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.या सरकारविरोधात बोलणाऱ्या राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, अभ्यासक व विचारवंतांवर दडपशाही करण्याची अनेक उदाहरणे ४ वर्षांत दिसून आली होती. हे सरकार संवैधानिक संस्थांवर देखील दबाव निर्माण करीत असल्याचा आरोप आम्ही अनेकदा केला. आयोगाने केलेल्या घूमजावाने या आरोपांना पुष्टीच मिळाली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
सरकारच्या दबावापोटीच वित्त आयोगाचे घूमजाव - विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 05:04 IST