Join us

सोशल मीडियाच्या आक्रमणातही रस्त्यावरील अभ्यासिका फुललेल्या

By admin | Updated: November 27, 2014 01:04 IST

पारतंत्र्यात अभ्यासाच्या जोरावर सामाजिक क्रांती घडवली़ तर स्वातंत्र्यानंतर अनेकांनी याच अभ्यासाच्या जोरावर देशाचे राजकारण व अर्थकारण आमूलाग्र बदलून टाकल़े

टीम लोकमत - मुंबई 
अभ्यास़़़ या एका गोष्टीने माणूस उत्तुंग शिखरे गाठतो, हवं ते कवेत घेतो़ अभ्यासाने अनेक दिग्गज घडले, ज्यांनी अगदी पारतंत्र्यात अभ्यासाच्या जोरावर सामाजिक क्रांती घडवली़ तर स्वातंत्र्यानंतर अनेकांनी याच अभ्यासाच्या जोरावर देशाचे राजकारण व अर्थकारण आमूलाग्र बदलून टाकल़े 
असा हा माणसे घडवणारा अभ्यास कोठे करावा, कसा करावा या दिव्यातून विद्यार्थीदशेत जावेच लागते. मुंबईत मात्र अभ्यासासाठी अनेक पर्याय आहेत़यापैकी प्रचलित असे अभ्यासाचे ठिकाण म्हणजे मोकळा रस्ता़़़ याला रस्त्याच्या वरच्या अभ्यासिका म्हटले तर गैर ठरणार नाही़ याचे वैशिष्टय़ म्हणजे या अभ्यासिकेने अनेक डॉक्टर, इंजिनीअर व उच्चपदस्थ अधिकारी घडवले आहेत़ सोशल मीडियाने शाळा व महाविद्यालयांमध्ये शिरकाव केला असला, तरी या अभ्यासिकांमधील विद्याथ्र्याची गर्दी कमी झालेली नाही़ गेली कित्येक वर्षे गरजू विद्याथ्र्यासाठी या रस्त्यावरच्या अभ्यासिका अत्यंत उपयोगी ठरत आहेत. 
मुंबईत तशा गल्लोगल्ली शेकडो अभ्यासिका आहेत़ पण या अभ्यासिकांना रात्रीच्या वेळेचे बंधन आह़े त्यामुळे चाळीत व झोपडपट्टीत राहणा:या विद्याथ्र्याना रात्रीच्या वेळी अभ्यासासाठी पर्यायी जागा शोधावी लागत़े विशेष म्हणजे ही अडचण केवळ येथील विद्याथ्र्याची नसून उच्चभ्रू सोसायटीतील विद्याथ्र्यानाही बहुतांश वेळा ग्रुप स्टडीसाठी गोंगाट नसलेली जागा शोधावी लागत़े या शोधमोहिमेतूनच मुंबईत काही ठिकाणी या रस्त्यावरच्या अभ्यासिका सुरू झाल्या आहेत़
परीक्षांच्या आधीचा काळ हा थंडीचा असतो़ त्यामुळे थंडीत अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसतो़ अशा अनेक अडचणींचा सामना करीत विद्यार्थी येथे अभ्यास करतात़ 
 
या अभ्यासिका नेमक्या कधी सुरू झाल्या हे अचूक सांगता येणो कठीण आह़े मात्र येथे अभ्यास करून अनेक जण आयुष्यात यशस्वी झाले आहेत़ महत्त्वाचे म्हणजे शौचालयाची व पाण्याची कुठलीही सोय नाही़