Join us
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची कामे ठप्प

By admin | Updated: April 28, 2017 02:45 IST

ठेकेदारांच्या प्रतीक्षेत उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामांनी पावसाळ्यात टेन्शन वाढवले असताना रस्ते कामांच्या मार्गातही

मुंबई : ठेकेदारांच्या प्रतीक्षेत उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामांनी पावसाळ्यात टेन्शन वाढवले असताना रस्ते कामांच्या मार्गातही नवीन संकट उभे राहिले आहे. रस्ते कामांसाठी लागणारी खडीच मिळत नसल्याने रस्त्यांची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्यांची कामे तरी प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदार, विभाग अधिकारी आणि अभियंत्यांना देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मुंबई ऐन पावसाळ्यात खड्ड्यात गेली होती. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या वेळी सर्व खबरदारी घेतली. मात्र खडीच्या रूपाने नवे संकट आले. यातून मार्ग काढण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न सुरू असून तोपर्यंत खणलेले रस्ते बुजविण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले. (प्रतिनिधी)